तुळजापूर, दि. १८ : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व दुकाने मागील दोन महिन्यापासून बंद असल्याने दुकानदार व कारागीर यांच्यावर घर भाड्यासह, दुकान भाडे व इतर खर्चामुळे उपासमारीची वेळ आली असल्याने सर्व दुकानदार हतबल झाले आहेत त्यामुळे इतर दुकानदार प्रमाणे सलुन व्यवसायिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दुकान उघडण्याची परवानगी द्यावी यासंदर्भात निवेदन देऊन विनंती करण्यात आली.

जिल्ह्यातील इतर दुकानदार प्रमाणे सकाळी आठ ते दोन या वेळेत सलून दुकाने चालू ठेवण्याची परवानगी द्यावी, सरकारने लागू केलेल्या गाईडलाईन नुसार कोरोना विषाणू संसर्ग बाबत दक्षता घेऊन काम करण्यास सर्व व्यवसायिक तयार आहेत. सलून दुकानदार यांना आपल्या नियम व अटी चा वापर करत एका दुकानात एका वेळी एक ग्राहक व मोठ्या दुकानात एका वेळी दोन ग्राहक अशी व्यवस्था करण्यात येईल,ग्राहकांची नाव व मोबाईल क्रमांक नोंद केली जाईल यासंदर्भात दैनंदिन गोषवारा व्यवसायिक ठेवतील अशी माहितीही या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, राज्य संघटक किशोर राऊत, जिल्हा सरचिटणीस दाजी पवार जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.