तुळजापूर : कुमार नाईकवाडी
श्री तुळजाभवाणी मंदीर संस्थान च्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी यांनी घोषणा केलेल्याप्रमाणे अत्यंत गरजू कूटूंबाना अन्नधान्य किट देले जाणार आहे.
आज तब्बल दोन महीने होत आले श्री तुळजाभवाणी मंदीर बंद आहे. तसेच तुळजापूर शहरातील मंदीराच्या पाठी मागील आराधवाडी -भिमनगर तसेच मातंगनगर येथील हातावर पोट असलेले गोरगरिब नागरीक हे मंदीर व येथिल उद्योग धंद्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे त्यांचे उपासमारीने प्रचंड हाल होत आहेत. तरी यात लक्ष घालून ५०००कीट मध्ये प्रथम प्राधान्य या भागाला द्यावे, या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार तसेच मुख्याधिकारी तुळजापूर यांना देण्यात आले. या निवेदनावर सागर कदम,किरण कदम यांची स्वाक्षरी आहे.
