वागदरी: एस.के.गायकवाड
पुणे येथुन गावाकडे येणा-या पती पत्नीचा आपघातातील मृत्यु झालेल्या मयतावर तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे अंतीम संस्कार करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पुकारलेल्या संचार बंदीमुळे निलेगाव ता.तुळजापूर येथील मुळ रहिवाशी असलेले पती पत्नी सिंहगड धायरी वडगाव पुणे येथून मोटारसायकलवरुन गावाकडे येत असताना वाटेत अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
तुळजापूर तालुक्यातील निलेगावचे दयानंद कुंडलीक दुपारगुडे हे पत्नी, दोन विवाहित मुलेव सुनासह सिंहगड धायरी वडगाव पुणे येथे राहत होते.
गेल्या दोन महीन्यापासुन कोरोनामुळे संचार बंदी लागु झाल्याने त्यांचे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक आडचणीमुळे उपासमारीची वेळ आल्याने त्यानी गावाकडे जाण्यासाठी दि.१७ मे रोजी मोटारसायकलीने सकाळी ७ वा. पुणे येथून निघाले असता अर्ध्या वाटेत इंदापूर जवळ सकाळी साडे अकरा वाजता पाणी पिण्यासाठी रोडच्या कडेला थांबले असता पाठीमागुन येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने सुवर्ण दयानंद दुपारगुडे वय ४५ ही जागीच ठार झाली तर दयानंद कुंडलीक दुपारगुडे वय ५२ वर्ष याना उपचारासाठी घेवुन जाताना मृत्यू झाला व त्यांच्या जवळ असलेली लहान मुलगी जखमी झाली. सदर घटनेची नोंद इंदापूर पोलीसात करण्यात आली असुन रात्री साडे दहा वाजता निलेगाव येथे मयतावर अंतिम संस्कार करण्यात आला.
त्यांच्या पश्चात वडील, दोन मुले, सुना , नातवंडे असा परिवार आहे.
