तुळजापूर : कुमार नाईकवाडी
- श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान येथील व्यवस्थापक व धार्मिक व्यवस्थापक तथा लेखपाल यांनी लाँकडाऊन काळात मंदीर प्रवेश बंदी असताना भाविकांना दर्शनासाठी सोडून लाँकडाऊन आदेशाचे उल्लंघन करुन श्री तुळजा भवानी मंदीरामध्ये सावळा गोधंळ चालु असुन याप्रकरणी चौकशी करुन मंदीर प्रशासनाच्या संबधित जवाबदार असणा-याविरुध्द
कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाव्दवारे शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्याम पवार यांनी सोमवार दि.१८ रोजी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानच्या अध्यक्षा यांच्याकडे केली आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पवार यानी म्हटंले आहे की, श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे व्यवस्थापक, धार्मिक व्यवस्थापक व लेखपाल यांचा सध्या सावळा कारभार चालु आहे. देशामध्ये व महाराष्ट्रात दि २२ मार्च २०२० पासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण लाँकडाऊन झाले आहे . भाविकांच्या सुरक्षेतेसाठी मंदीर संस्थानने भाविक,याञेकरुसाठी मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व तसेच श्री देवी ची नित्योपचार पुजा प्रमुख मानकरी च्यावतीने केली जाईल असे आदेश काढले होते परंतु आपल्या श्री तुळजा भवानी भवानी मंदीर संस्थानच्या व्यवस्थापक,धार्मिक व्यवस्थापक व लेखपाल यांनी या आदेशाची पायमल्ली करुन भाविक व याञेकरुना दर्शनास सोडत असल्याचा आरोप करुन दि.८ मे रोजी सकाळी ९ ते १० या दरम्यान एका परिवाची रजिष्टरला एन्ट्री करुन दर्शनास सोडुन शासन व आपल्या आदेशाचे पालन न करता संबधितानी पदाचा दुरुउपयोग करुन मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार केली आहे.त्याचबरोबर सध्या सर्वञ कोरोना वायरसचे मोठे संकट असताना सुद्धा महाराष्ट्र शासन कोरोना विरुद्ध लढत आहे.
जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानच्या अध्यक्षा यांनी तुळजापुर मंदीरात प्रवेश एन्ट्री नोंद रजिष्टर,सी.सी.टीव्ही कँमेरे फुटेज पाहणी करुन मंदीर व्यवस्थापक ,धार्मिक व्यवस्थापक तथा लेखपाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्याम पवार यांची स्वाक्षरी आहे.
