तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तिर्थक्षेञ तुळजापुरात पुणे येथुन आलेल्या २१ वर्षीय गर्भवती माहिलेचा कोरोना अहवाल पाँझीटिव आल्यानंतर तिच्यावर उपजिल्हारुग्णालयातील परिसारातील कोरोना रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर तिचा दुसरा तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर दहा दिवसाने शुक्रवार दि29रोजी ती कोरोना तुन मुक्त झाल्याने तिला रुग्णालयातील डाँक्टर मंडळी नी तिच्यावर पुष्पवृष्ट्री करुन तिला निरोप दिला.
सदरील 21 वर्षीय गर्भवती 19मे रोजी कोरोना बाधित रिपोर्ट आल्यानै तिला येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या संपर्कातील तेवीस लोकांचे स्वँब तपासणी स पाठवण्यात आले, ते निगेटीव्ह आले. नंतर तिच्यावर दहा दिवस उपजिल्हारुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डाँ. चंचला बोडके यांच्या मार्गदर्शना खाली कोरोना रुग्णालयाचे प्रमुख डाँ. दिग्विजय कुतवळ यांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर दहा दिवसा नंतर तिचा रिपोर्ट निगैटीव्ह आल्यानै तिला आज घरी पाठवण्यात आले.
यावेळी डाँ. अमित शिरशीकर, डाँ श्रीधर जाधव, डाँ दिग्विजय कुतवळ, डाँ चंद्रकांत क्षिरसागर, सुनिल नायकल, सिस्टर भोसले, सिस्टर शितल, सिस्टर क्षिरसागर यांनी सदरील गर्भवती महिलेस निरोप दिला.

