काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार दि. (28) रोजी सायंकाळी सहा वाजता मदरसा दावतुल उलुम बहुउद्देशीय सामाजिक संस्था काटी, काक्रंबा,नळदुर्ग आणि उस्मानाबाद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, मुंबई, भिवंडी आदि ठिकाणांहून येऊन येथील जिल्हा परिषद प्रशाला, येडेश्वरी कन्या प्रशालेतील आपला 14 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर घरी जाताना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून 17 कुटूंबियांना तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जमदाडे यांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या 17 किटसह या संस्थेच्या माध्यमातून काटी येथे 175 किराणा साहित्याच्या किटचे वाटप करून मदतीचा हात देऊन लोकांची उपजीविका भागविण्यासाठी प्रयत्न केला आहे.
सध्या चालू असलेल्या कोरोना व्हायरस या विषाणूमुळे जे देशात राज्यात व आपल्या गावात लाॅकडाऊन चालू आहे त्यामुळे गोरगरिबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याअनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत जातीभेदाच्या भिंती पार करून मदरसा दावतुल उलुम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हाभरात दहा हजार किटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव पैगंबर काझी यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिली.या त्यांच्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जमदाडे, सपोनि राठोड, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,पो.हे.कॉ. नाईकवाडी,चेअरमन विक्रम देशमुख, सरपंच आदेश कोळी, पत्रकार उमाजी गायकवाड, सुजित हंगरकर, मकरंद देशमुख, करीम बेग,अहमदखान पठाण, बाळासाहेब भाले,भैरी काळे, मुईज इनामदार, हाफिज, अकील इनामदार, हाफिज जिलानी कुरेशी आमिरखान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
