तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने शिवरत्न कार्यालयामध्ये दि.१४ रोजी  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त संभाजीराजेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

      देशासह राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वच सण,उत्सव साजरे करण्यात प्रशासनाच्या वतीने बंधने घालण्यात आली आहेत.पाच ते दहा व्यक्तींच्या उपस्थितीतच सण उत्सव साजरे करण्यात येत आहेत.कोरोनाच्या सावटाखाली दि.१४ रोजी धर्मवीर  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त शिवरत्न प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवरत्न नगर येथील शिवरत्न कार्यालय येथे छत्रपती संभाजीराजेंच्या प्रतिमेस शिवरत्नचे सचिव अप्पुराजे भोसले यांच्या हस्ते पुष्प अर्पण करीत अभिवादन करून छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सर्वानी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे,मास्कचा वापर करावा व घरीच रहावे असा सल्ला अप्पुराजे भोसले यानी कार्यकर्त्यांना दिला.

     यावेळी संस्थापक सचिव अप्पुराजे भोसले,नागेश घोटकर,शाहिर गायकवाड, महेश माळी,तुकाराम गायकवाड,दादा पाटील,सुयश गायकवाड,विकास हासकावळे,किरण भोसले,समर्थ घोटकर,अजय गायकवाड, आदी शंभूप्रेमीनी राजेंना अभिवादन केले.
 
Top