उस्मानाबाद, दि. 23 : येथील सामान्य रुग्णालयातून मंगळवार दि. 23 जून रोजी 53 स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले होते. त्याचे सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून त्यापैकी तीन पॉजिटीव्ह व 50 नेगेटिव्ह आले आहेत.
पॉजिटिव्ह आढळलेल्या रुग्णापैकी दोन रुग्ण सलगरा (दि ) ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत. तर तिसरा रुग्ण नळदुर्ग ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.
दरम्यान, परंडा येथील रुग्ण काल रात्री सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठविला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाची एकूण रुग्ण - 186
बरे होऊन घरी परतलेले रुगण - 136
मृत्यू - 08
उपचार घेत असलेले रुग्ण - 42