तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील रोहीत्र जळाल्याने अर्धा गाव गेली चार दिवसापासुन अंधारात असल्याने ग्रामस्थामधुन संताप व्यक्त होताना दिसत आहे.जर जळालेले रोहीत्र लवकर नाही बसवले तर मात्र औद्योगिक वसाहतीचीही विज बंद करून टाकु असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आहे.
अगोदरच कोरोनाच्या भीतीने नागरीक हैराण झाले असताना तामलवाडी येथील रोहीत्र जळाल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजुचा भाग म्हणजे जवळपास अर्धा गाव गेली चार दिवसापासुन अंधारात चाचपडत आहे. विज नसल्याने जनता उकाड्याने हैराण झाली असुन रात्री बाहेर झोपावे तर चोरांची भीती अन् दिवसा बाहेर पडावे तर कोरोनाची भीती अशी अवस्था सध्या येथील नागरीकांची झाली आहे. गेली चार दिवसापासुन विज नसल्याने ऐन पावसाळ्यात नागरीकांना पाण्यासाठी इतरत्र भंटकंती करावी लागत असुन या परीसरामध्ये वीज नसल्याने मोबाईलद्वारे होणारी महत्वाची कामे तसेच इतर विजेवर अवलंबून असणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.दोन दिवसापूर्वी एक रोहीत्र बसवला परंतु तो कमी दाबाचा असल्याने तो लगेच जळाल्याने नविन उच्च दाबाचा रोहीत्र बसवावा लागणार आहे.चार दिवसापासुन वीज नसल्याने नागरीकांमधुन संताप व्यक्त होताना दिसत आहे.माळुंब्रा येथील महावितरण अधिकारी कावरे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता मोबाईल बंद असल्याने त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही. लवकरात लवकर नविन रोहीत्र नाही बसवल्यास तामलवाडी येथील औद्योगिक वसाहतीचीही विज बंद करू असे काही संतप्त ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आहे.
उच्च दाबाचा रोहीत्र उपलब्ध नाही - गादे
रोहीत्र जळाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.तुळजापुर येथील महावितरणचे अधिकारी गादे यांच्याशी याबाबत दुरध्वनीवरून संपर्क साधला असता सध्या उच्च दाबाचा रोहीत्र उपलब्ध नाही आम्ही प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर उच्च दाबाचा रोहीत्र बसवुन तामलवाडी येथील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल असे त्यांनी तरूण भारतशी बोलताना सांगितले आहे.