मुंबई, दि. 24 : पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे राज्य सचिव अनिल चौधरी यांनी राज्यात सर्व प्रथम राज्यपाल यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी केली आहे.

विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी दिल्यास राज्यातील पत्रकारांच्या समस्या ते सोडवु शकतील. तसेच विनोद पत्रे हे पदवीधर पत्रकार असून धाडसी व मनमिळावु वृत्तीचे असून त्यांचे राज्यातील ग्रामीण तथा शहरी पत्रकारांशी चांगले संबंध आहे. विनोद पत्रे हे पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील दहा वर्षापासून अहोरात्र झटत असून बऱ्याचवेळेस आंदोलने सुध्दा केली आहेत. पत्रकारांमधुनच विधान परिषदेवर विनोद पत्रे यांना पत्रकारांच्या मागण्यासाठी संधी द्यावी अशी "पत्रकार संरक्षण समिती" च्या राज्यातील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी तसेच पञकार बांधवांकडून निवेदनाव्दारे मागणी होत आहे.
 
Top