उस्मानाबाद, दि.29 : जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गांचा वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 42 व्हेंटिलेटर मशीन प्राप्त झाले आहेत.

सद्यस्थितीमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी एकूण 21 व्हेंटिलेटर उपलब्ध होते. केंद्र शासन आरोग्य मंत्रालयाकडून 42 व्हेंटिलेटर प्राप्त झाल्यामुळे जिल्हयात कोरोना (कोविड-19) रुग्णांना उपचारासाठी 63 व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले आहेत, अशी  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.व्ही.गलांडे यांनी दिली.

 
Top