जळकोट, दि. २९ : मेघराज किलजे
एक एप्रिलपासून अणदुर (ता.तुळजापूर) येथील अत्यंत गरजू नागरिकांना केशव वाचनालय व साहेबराव घुगे मित्र मंडळाच्या वतीने घरपोच जेवण अभियान राबवले जात आहे .दि.२९ रोजी या अभियानाचा ९० वा दिवस होता.सातत्यपूर्ण या सेवेमध्ये यापूर्वी अनेकांचे हातभार लागले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये ही सेवा पुरवत आहेत.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती कडून मोठे सेवा कार्य सुरू आहे. त्यामध्ये दि.२९रोजी जनकल्याण समिती कडून घरपोच जेवण अभियानातील मंडळी व अत्यंत गरजू अशा ४० कुटुंबीयांना अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले. १० दिवस पुरेल एवढे अन्नधान्य जनकल्याण समितीचे जिल्हा सहकार्यवाह ॲड गिरीश पाटील,ॲड अतुल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी केशव वाचनालयाचे अध्यक्ष उमाकांत करपे, सचिव साहेबराव घुगे ,महावीर कंदले ,राहुल राठोड, अभाविपचे राजकुमार गाढवे , शिवानंद खुणे, काशिनाथ घुगे, विश्वनाथ लोंढे आदीजण उपस्थित होते.