तुळजापुर : कुमार नाईकवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे-पवार यांच्या वाढदिवसाचे औच्युत साधुन दि.३० जुन मंगळवार रोजी तुळजापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वतीने कोरोना संसर्गजन्य रोगा च्या पार्श्वभूमीवर शहरातील नाभिक समाज बांधवाना फेस शिल्ड मास्क चे वाटप करण्यात आले.

 या वेळी ज्येष्ठ नेते गोकुळतात्या शिंदे, धैर्यशील पाटील, धनंजय पाटील, बबन गावडे, चंद्रकांत नेपते, अमर चोपदार, सचिन कदम, गणेश नन्नवरे,शरद जगदाळे,संदीप गंगणे,महेश चोपदार,अप्पासाहेब पवार,दुर्गेश साळुंके,नितीन रोचकरी,शशी नवले,मकसुद शेख,चेतन शिंदे,तौफीक शेख,अभय माने,बाळु पेंदे व नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी व बांधव उपस्थित होते.
 
Top