अमरसिंह देशमुख

काटी : उमाजी गायकवाड

रोटरी क्लब उस्मानाबाद  वर्ष 2020 - 21 च्या कार्यकाळासाठी रोटरी क्लब उस्मानाबादच्या अध्यक्षपदी अमरसिंह देशमुख (काटीकर) यांची तर सचिवपदी इंद्रजित आखाडे यांची निवड करण्यात आली.
इंद्रजित आखाडे 

रोटरी क्लब ही सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आहे. वर्षभरात आरोग्य विषयक कॅम्प, जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालयामार्फत नेत्र तपासणी शिबीर, सामाजिक कार्यक्रम, जलसंवर्धन, शैक्षणिक असे विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याचा मानस आहे असे नविन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.रोटरी क्लब उस्मानाबादचे नूतन अध्यक्ष श्री. अमरसिंह देशमुख (काटीकर) हे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यवसायिक असून त्यांचा ग्रामीण व शहरी भागात दांडगा जनसंपर्क आहे आणि सामाजिक कार्याची  त्यांना अत्यंत आवड आहे. नूतन सचिव श्री. इंद्रजित आखाडे पेशाने  कर सल्लागर आहेत. दोघांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.      
                 
  या  निवड प्रसंगी मावळते अध्यक्ष श्री. सुधाकर भोसले , सचिव सुरज कदम,   रोटरीचे रविंद्र साळुंके , सुनील गर्जे , रणजित रणदिवे , प्रदीप मुंडे , सौ.अनार साळुंके , संतोष शेटे , नितीन तावडे , प्रवीण काळे , प्रशांत पाटील  ,शैलेश मेहता , कुणाल गांधी , चित्रसेन राजेनिंबाळकर , अभिजित पवार , श्री. धनंजय वाकुरे, शाम भन्साळी  व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.


 
Top