आंबी, दि. 21 :
अनिता निवता शिंदे उर्फ लाकडी, वय 45 वर्षे, रा. पारधी पिढी, मौजे रोहकल, ता. परंडा यांचे भाऊ- बापूराव, बाळराजा, समाधान, सुदीन हे त्यांच्या घरा शेजारीच राहतात. अनिता शिंदे यांचे पती निवांत बिरक्या शिंदे यांचे वरील चौघा शालकांनी सन- 2016 साली अपहरण केले होते. त्यावरुन अनिता शिंदे यांनी वर नमूद आपल्या चौघा भावांविरुध्द पो.ठा. आंबी येथे प्रथम खबर दिली होती. हा अपहरण खटला सध्या भूम न्यायालयात सुनावणीस आहे. बहीण- अनिता हिने न्यायालयात सुनावनी दरम्यान माघार घ्यावी या करीता वरील चौघे भाऊ तीच्यावर वारंवर दबाव टाकत होते. त्यांच्या या दडपणास बहीण- अनिता हिने कधीही दाद दिली नाही. याचा राग मनात धरुन दि. 21.06.2020 रोजी सकाळी 09.00 वा. सु. वरील चौघा भावांनी बहीण- अनिता शिंदे हिस उचलून आपल्या दारा समोर नेउन जमीनीवर ठेउन मारहाण करुन तलवारीने गळा कापून खुन केला आहे. अशा मजकुराच्या मयताचे पती- निवांता शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन वरील चौघा भावांविरुध्द भा.दं.वि. कलम- 302, 452, 34, सह भारतीय हत्यार कायदा कलम- 4,25 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
