आंबी : सुप्रीया समाधान मोटे, वय 20 वर्षे, यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1) समाधान मुरलीधर मोटे (पती) 2)हरिश्चंद्र मोटे (सासरा) 3)जनाबाई मुरलीधर मोटे (सासु) 4)राजकन्या दशरथ कोळेकर (नणंद) सर्व रा. रत्नापूर, ता. परंडा यांनी मागील दोन वर्षापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्यांच्या या त्रासास कंटाळून दि. 17.06.2020 रोजी राहत्या घरी सुप्रीया मोटे यांनी विष प्राशन केल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या लक्ष्मण भिमराव मिसाळ (मयताचे पिता) रा. पुणे यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 306, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 20.06.2020 रोजी नोंदवला आहे.
 
Top