उस्मानाबाद : पुणे शहरातील पो.ठा. विश्रामबाग गु.र.क्र. 82/2018 भा.दं.वि. कलम- 379 नुसार चोरीस गेलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर प्रो व स्प्लेंडर प्लस अशा दोन मोटारसायकलसह आतिश हनुमंत सगर, वय 19 वर्षे, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 21.06.2020 रोजी ताब्यात घेतले आहे. या बाबतीत पुणे शहर पोलीस उर्वरीत तपास कारवाई करणार असुन आरोपीस सध्या पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, आण्णाराव खोडेवाड, सपोफौ- खोत, पोहेकॉ- थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.
