काटी : उमाजी गायकवाड
केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी देशभरातील विविध जिल्ह्यांमधील जवाहर नवोदय विद्यालयांसाठी जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परिक्षेत तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी चि.उदय नाना सुरडे याची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूरसाठी निवड झाली आहे.
उदय सुरडे या विद्यार्थ्यांस बी.एस.भोईटे यांचे मार्गदर्शन लाभले. या त्याच्या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेखु जेटीथोर, विस्तार अधिकारी मल्हारी माने, सहशिक्षक बी.एस. भोईटे, अशोक जेटीथोर, श्रीमती सुषमा देशमुख,श्रीमती गीताश्री पाटील, श्रीमती द्रोपदी लांडगे, सुखदेव भालेकर यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
