तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर येथे आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त नेहरु युवा केंन्द्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्धमाने दि.२१ रविवार रोजी जागतिक योग दिनाचे औच्युत साधुन योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
उस्मानाबाद नेहरु युवा केंन्द्राचे लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा योग दिन साजरा करण्यात आला.
"करा योग रहा निरोग" या म्हणीप्रमाणे तुळजापूर येथील युवकांना एकत्रित करुन वेगवेगळ्या योग प्रकाराचे प्रात्यक्षिके घेऊन हा योगदिन साजरा करण्यात आला. दररोज व नियमित योग केल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. व व्यक्ती कायस्वरुपी निरोगी राहतो. म्हणुन प्रत्येकाने एक दिवसापुरते योग दिना दिवशी योग न करता दररोज नियमित योग करावा.
यावेळी किशोर नावडे, गणेश नावडे, पंकज शिंदे, निलेश सुरवसे युवकही इतरही उपस्थित होते
