जळकोट,दि. २१ : मेघराज किलजे  

 मौजे नंदगांव(ता.तुळजापूर) येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार राणा जगजितसिंह  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  १४ व्या वित्त आयोगातील रु१५ लक्ष किंमतीच्या अंबाबाई मंदिर ते बसवेश्वर चौक सिमेंट रस्त्याचे लोकार्पण केले.

समाजकल्याण विभाग अंतर्गत अनु.जाती/नवबौध्द घटकांचा विकास कार्यक्रमांतर्गत नंदगांव येथील बौद्ध नगर, रोहिदास नगर, लोहगाव रोड झोपडपट्टी, रोहिदास नगर २, शास्त्री नगर, ज्ञानेश्वर नगर, झोपडपट्टी पूर्व, साठे नगर या भागात प्रत्येकी रु०३ लक्ष या प्रमाणे रु२४ लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्यांच्या आठ कामांचे भूमिपूजन केले.

तसेच अक्कलकोट रोड ते काजीकणबस जिल्हा सरहद्द या २ किलोमीटर या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रु१८.७५ लक्ष किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन केले.  

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासुन जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालुन काम करणाऱ्या सर्व प्रशासकीय, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग व गावातील कोरोना सहाय्यता कक्ष पदाधिकाऱ्यांचा, रामोशी बांधवांचा, आशा सेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार  केला. सर्वांनी सतर्क राहुन काळजी घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी तहसीलदार तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पिंटू मुळे, सिद्धेश्वर कोरे, भिवा इंगोले, श्रद्धानंद कलशेट्टी, सरपंच नागनाथ मोरे, माजी सरपंच काटे गुरुजी, उपसरपंच डॉ.सात्विक शहा, राजीव तुप्पे, मल्लिनाथ गुडडे, भीमराव चिंनगुंडे, धर्मराज तुपे, नागनाथ दणाणे, दत्तात्रय शेवाळे, अण्णाराव पाटील, दिपक कुलकर्णी, वैभव पाटील, परमेश्वर गबूरे यांच्यासह ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top