जळकोट,दि.२०: मेघराज किलजे        

   सिंदगाव( ता.तुळजापूर) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात १४ व्या वित्त आयोगातून रु ०६ लक्ष खर्चून पूर्ण होणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम, तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रु०५ लक्ष खर्चून पूर्ण होणाऱ्या सिमेंट रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे.

यावेळी  बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून या पुढे देखील विविध योजनेमधून गावासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे गावकऱ्यांना आश्वासित केले.

यावेळी गणेश सोनटक्के, पिंटू मुळे, सिद्धेश्वर  कोरे, सरपंच राधाताई करंडे, मिनगिरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top