काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप श्रीरंग साळुंके यांचे भाचे श्री.अभिजित लक्ष्मण जगताप (सोलापूर) आणि सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डोके यांचे भाचे श्री. अतुल काटे (गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर)  यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019  दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये काटी आणि सावरगावचे भाचे असलेले अभिजित जगताप तहसीलदार पदी व अतुल काटे यांची नायब तहसीलदार पदी वर्णी लागली आहे.

  सध्या अभिजित जगताप हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे नगरपरिषदेत प्रशासकीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काटे यांनी पहिल्या प्रयत्नातच नायब तहसीलदार पदी वर्णी लागली आहे. सागर काटे हे मुंबई येथे वित्त विभागात राज्य कर निरिक्षक वस्तू व सेवा विभागामध्ये कार्यरत होते. या त्यांच्या यशाबद्दल मामाच्या गावात सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top