जळकोट,दि.७ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावातील संभाजी नगर भागातील रस्ता दुहेरी करण्यात आला. दुहेरी रस्ता करूनही वाहतुकीला खांबा मुळे व आजूबाजूला वाहने लावत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.हा रस्ता सुरळीत करण्याची मागणी सध्या होत आहे.
जळकोट ग्रामपंचायतीने जळकोट बस स्टँड पासून हा रस्ता जळकोट गावचा निम्मा भाग व जळकोटवाडी, मानमोडी, लोहारा, जेवळी, माकणी, फणेपूर आदी गावांना जोडला गेला आहे. हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत होता. जळकोट ग्रामपंचायतीने काही प्रमाणात सिमेंट काँक्रेट करून दुहेरी केला आहे. या रस्त्यावर प्रचंड वर्दळ आहे. चारचाकी व दुचाकी वाहने सतत धावत असतात. या रस्त्याच्या मध्यभागी समाजसेवक भीमाशंकर कुंभार यांनी झाडेही लावली आहेत. या झाडामुळे रस्ता सुशोभित दिसतो. ज्यावेळी हा रस्ता झाला त्यावेळी विजेचे खांब होते. विजेच्या तारा रस्त्याच्या बाजूला घेतले गेले आहेत. विजेचे खांब तसेच आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा ह्या पार्किंग म्हणून वापरल्या जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. माणसांची सतत या रस्त्यावर वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या भागात बाजारपेठ असल्याने वाहने येत असतात. तरी हा रस्ता विजेचे खांब काढून व रस्त्याच्या बाजूला उभे राहणारे वाहने न लावता रस्ता दोन्ही बाजूने सुरू राहावा. अशी मागणी या भागातील रहिवाशी व वाहनधारकातून करण्यात येत आहे.
