काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती,माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख काटीकर( बी.एन. देशमुख) वय (85 वर्षे) यांचे दि. 29 रोजी मध्यरात्री 1:30 वाजनेच्या सुमारास औरंगाबाद येथील राहत्या घरी दु:खद निधन झाले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी खासदार अँड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, विरोधीपक्ष नेते उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होते. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. मराठवाड्याच्या जडणघडणीत पर्यायाने महाराष्ट्राच्या मोजक्या पुरोगामी नेतृत्वापैकी एक, शेतकरी कामगार पक्षाचे मातब्बर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. तुळजापूर तालुक्यातील काटी गावाची ओळख बॅरिस्टर बी.एन. देशमुख यांचे गाव म्हणून संबंध महाराष्ट्राभर होती.
सर्वसामान्यांचे प्रश्नावर लढणारऱ्या काटीचे भूमीपुत्र व महाराष्ट्राचे भूषण असलेले कै.बॅरिस्टर बी.एन. देशमुख उर्फ तात्यासाहेब यांच्या अस्थी कलशाचे काटीतील प्रत्येक नागरिकांना अंतीम दर्शन व्हावे यासाठी त्यांचा अस्थी कलश मायभूमीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. कै.बी.एन. देशमुख साहेबांच्या अस्थी कलशाचे पूजन, दर्शनानंतर येथील तलावात अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे.
अभिमन्यु अविनाश देशमुख हे तात्यासाहेबाचा अस्थी कलश घेऊन सकाळी 8 वाजता येथील मुख्य बाजार चौकात येत आहेत. यानंतर नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 11 पर्यंत हा अस्थी कलश दर्शन घेण्यासाठी बाजार चौक येथे ठेवण्यात येणारआहे. त्यानंतर हा अस्थी कलश काटीतील प्रमुख मार्गावरून येथील तलावात ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या अस्थी कलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. तरी कै. बी.एन. देशमुख यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घ्यावे तसेच अस्थी कलश विसर्जनावेळी उपस्थित रहावे आवाहन करण्यात आले आहे.
