नळदुर्ग : विलास येडगे

 कोरोनाच्या महामारीमुळे सध्या आपल्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आपल्या जिल्ह्यात देखील रक्ताचा तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासनाकडून रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढी च्या सहकार्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार व शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थान नळदुर्ग यांच्या वतीने धर्मवीर छञपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती तसेच शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

        शिबीराची सुरुवात भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज, स्वा. वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन स्वयंसेवक उमाकांत मिटकर, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, सुशांत भूमकर, पद्माकर घोडके, संतोष पुदाले, संजय बताले, ज्ञानेश्वर घोडके, मुकुंद नाईक, धिमाजी घुगे,सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,संजय जाधव, श्रमिक पोतदार, गोपाळ देशपांडे, पत्रकार तानाजी जाधव, प्रभाकर घोडके, उत्तम बनजगोळे, राहुल हजारे, गजानन कुलकर्णी, विशाल डुकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदानाची सुरुवात महिला रक्तदात्या रोहिणी तळेकर यांच्या पासून झाली. कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा कमी व्हावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 61 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्र कार्यात आपले योगदान दिले रक्तपेढीचे अक्षय जगताप यांनी बोलताना रक्तदात्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना रक्ताची गरज भासल्यास महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय रक्तपेढीतून रक्त उपलब्ध होईल असे सांगितले तसेच सर्व रक्तदात्यांना महेश घोडके यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मास्कचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबीर संपन्न होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच शिवप्रतिष्ठान चे धारकरी यांनी परिश्रम घेतले.
 
Top