तुळजापुर : कुमार नाईकवाडी
अखंड हिंदुस्थान चे दैवत असलेला रयतेचा राजा छञपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यअभिषेक सोहळा दि.६ जुन शनिवार रोजी श्री तुळजा भवानी मातेच्या राजे शहाजी महाद्वार समोर साजरा करण्यात आला.
छञपती शिवाजी महाराज यांच्या ६ जुन शिवराज्य अभिषेक दिनसोहळ्याचे औच्युत साधुन येथील राजे शहाजी महाद्वार समोर छञपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यअभिषेक सोहळ्याची प्रतिमा व राजा छञपती शिवाजी महाराज यांचा अर्थ पुतळ्यास तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुजन करुन, पुष्पहार अर्पन करुन महाआरती करवुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक नागेश नाईक, औंदुबर कदम, विजय कंदले, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, युवा नेते आनंद कंदले, नाथ शिंदे आदीची उपस्थित होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शोसल डिसलेन्स ठेवुन छञपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक सोहळा करण्यात आला.
