खानापूर : बालाजी गायकवाड

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे पंचामृताने शिवछत्रपतींच्या मुर्तीला अभिषेक करून शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.
    
 मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनिल नागणे,मराठा सेवा संघ अध्यक्ष परमेश्वर शिंदे ,उपाध्यक्ष शिवाजी जाधव ,राजाभाऊ कोरे यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करत पंचामृताने शिवछत्रपतींच्या मुर्तीला अभिषेक  करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
  
   छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी कोरोनाच्या  भीषण परीस्थित दुर्गराज रायगडावर गर्दी होऊ नये म्हणून आपआपल्याला गावात ,घरात सामाजिक अंतर पाळत, कोरोना विषाणूचा प्रसार होणार याची दक्षता घेऊन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले होते.याला प्रतिसाद देत खडकी येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्सहात साजरा न साधेपणाने साजरा करण्यात आला.

यावेळी अण्णाराव गोसावी,नारायण जवान ,शरफोद्दीन मुजावर ,बाळू साळुंके , ज्ञानेश्वर शिंदे, सतीश नागणे, विशाल सावंत, समाधान नागणे ,अजय नागणे हे उपस्थित होते.
 
Top