तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या राजा छञपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा तुळजापुरात शिवप्रेमी व संघटनेच्या वतीने दि.६ जुन शनिवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

तुळजापुर येथील शिवाजी चौक या ठिकाणी छञपती शिवाजी महाराज यांचा पंच धातुच्या अर्ध पुतळा ठेवुन त्या पुतळ्यास वैद्यीक मंञ घोषात पंचामृत व जलाअभिषेक घालुन पुष्प फुले वाहुन छञपती महाराज यांचा जयघोष करीत शिवराज्य अभिषेक सोहळा शिवप्रेमी च्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

 या वेळी महंत माऊजीनाथ महाराज, किशोर पवार आण्णासाहेब क्षिरसागर कुमार टोले,सुदर्शन वाघमारे, महेश गवळी, संदीप गंगणे, सतिश खोपडे, पुरुषोत्तम जेवळीकर श्रीकांत कावरे,सारंग कावरे सागर इंगळे जिवन इंगळे, अर्जुन सांळुके, दादा भोसले, नितीन जट्टे, मधुकर शेळके, सुजय शेळके, महेश शिंदे, उमेश दळवी, सागर पारडे आदीसह शिवप्रेमी उपस्थित होते.

येथील शिवाजी चौकात छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे गेल्या वर्षभरापासुन काम रखडले आहे. यामुळे शिवप्रेमी मधुन नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी तुळजापुर नगरपरिषद च्या प्रशासकीय अधिकारी वर्गानी लवकरात लवकर छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे रखडलेले काम तात्काळ चालु करावे, अशा भावना शिवप्रेमीतुन व्यक्त केल्या जात आहेत.
 
Top