तुळजापुर : कुमार नाईकवाडी
येथील तुळजापुर( खुर्द) मधील जय शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने व शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने दि.६ जुन शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्य अभिषेक सोहळ्याचे औच्युत साधुन येथील छञपती शिवाजी महाराज मुर्तीची पुजा समितीचे प्रमुख मोहन भोजणे यांच्या हस्ते करण्यात आली.
छञपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात शिवराज्य अभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी रा.काँ युवा नेते गणेश नन्नवरे,शहाजी गायकवाड,नाना भोजणे,सुरज लोले,जालु जाधव,विजय नन्नवरे,नेताजी भोजणे,अभिजीत लोले,अमर माळी यांची उपस्थित होते.
