तुळजापूर दि ६ : कुमार नाईकवाडी
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या विचारांचे अनुकरण प्रत्येक तरुणांनी करावे असे आवाहन क्रीडा भारतीचे जिल्हा प्रमुख गणेश जळके यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करताना तुळजापूर संस्कार भारती बाविसावा वर्धापनदिन येथील कृष्ण मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी क्रीडा भारतीचे जिल्हाप्रमुख प्रमुख गणेश जळके, सावरकर विचार मंच अध्यक्ष बाळासाहेब शामराव, संस्कार भारती देवगिरी प्रांत सहमंत्री डॉ. सतीश महामुनी , अध्यक्ष पद्माकर मोकाशे, महामंत्री सुधीर महामुनी, उपाध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे कोषाध्यक्ष अविनाश धट, चित्रकला विभाग नंदकुमार पोतदार, संगीत विभाग प्रसाद महामुनी, रांगोळी विभाग लक्ष्मीकांत सुलाखे यांची याप्रसंगी उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत सुधीर महामुनी यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक अध्यक्ष पद्माकर मोकाशे यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगून क्रीडा भारती चे जिल्हा प्रमुख गणेश शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी अनुकरणीय इतिहास ठेवलेला आहे त्याचे मार्गदर्शन घेऊन आपण सर्वजण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांच्या विचारांनी जीवन जगले पाहिजे आठवले इतिहास अंगीकारणे हेच आपल्यासाठी खूप मोठे दिव्य आहे असेही त्यांनी सांगितले.
उपस्थित कलाकारांना मार्गदर्शन करताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सावरकर विचार मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब शामराज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हाच सर्वश्रेष्ठ विचार आहे या विचारांनी सर्व कार्यकर्ते काम करीत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा दडलेली आहे. 22 वर्षापासून तुळजापुरात संस्कार भारती शहरातील प्रमुख संस्था म्हणून वाटचाल करते आहे संस्कार भारतीच्या कला क्षेत्रातील योगदान बाबत बाळासाहेब शाम राज यांनी गौरवोद्गार काढले. प्रदेश सहमंत्री डॉ . सतीश महामुनी यांनीही याप्रसंगी संस्कार भारतीच्या वाटचाली बाबत माहिती सांगितली. संगीत विभागाच्या आठवणी याप्रसंगी कला साधक प्रसाद महामुनी यांनी कार्यक्रमात मांडल्या. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सुलाखे आणि आभार प्रदर्शन सुधीर महामुनी यांनी मानले सोशल डिस्टन्स राखून कार्यक्रम स्थळ सॅनिटायझर करून सदर कार्यक्रम घेण्यात आला. सर्व कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
