तामलवाडी  : सर्जेराव गायकवाड 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त सुरतगाव ता तुळजापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त  विद्यमाने दि.६ रोजी  रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८० शिवभक्तांनी रक्तदान केले.

      हिंदवी स्वराज्य संस्थापक,महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त तुळजापुर तालुक्यातील सुरतगाव येथे दि .६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ व  संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी शिवमुर्तीस दुग्धाभिषेक घालुन व पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला व नंतर रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीरामध्ये ८० शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदवला.

   यावेळी विठ्ठल गुंड,आबासाहेब गुंड,संभाजी ब्रिगेडचे शरद पवार,सुनिल नागणे,महादेव मगर,बापुराव दराडे,कृष्णा गुंड,देवानंद काळे,राम गुंड,पंडीत काळे,पांडुरंग गुंड,अमित पाटील,कृष्णा पाटील,आकाश गुंड,कीरण मगर,महेश नकाते,विजय नकाते,सुरज माळी,गोविंद घोडके,महेश गुंड,लक्षण गुंड आदी शिवभक्त उपस्थित होते.
 
Top