तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त शिवरत्न कार्यालय येथे दि. ६ रोजी शिवमुर्तीस दुग्धाभिषेक घालुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
कोरोना या संसर्गाने देशासह राज्यामध्ये थैमान घातले असुन या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त शिवरत्न नगर येथील शिवरत्न कार्यालय येथेच शिवरत्न क्रिडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच कारकर्त्यांच्या उपस्थितीत दि.६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस दुग्धाभिषेक घालुन व शिवमुर्तीस पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीवर दहा रुपयांच्या नाण्यांची बरसात करण्यात आली.कोरोनामुळे रयतेवर ओढावलेले संकट लवकर दुर होऊ दे अशी प्रार्थना शिवचरणी करून प्रत्येकाने प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यानी यावेळी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड,संस्थापक सचिव अप्पुराजे भोसले,राम कांबळे,रामा पाटील,महेश माळी,निरंजन करंडे,अजय गायकवाड,दादा पाटील,सागर भाकरे,संतोष जगताप आदी शिवभक्त उपस्थित होते.
