तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजा भवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडी कामगार संघटना व स्वच्छता कर्मचारी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या संपुर्ण जगात कोरोना वायरस आहांकार माजविल्याने या उद्वभवलेल्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रक्त पुरवठ्याचा तुटवडा कमी पडत असल्याने गरजु लोकांना रक्ताची नितांत गरज भासत आहे या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीराचे आयोजन करावे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या वतीने आव्हान करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासु नये यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी व स्वच्छता कर्मचारी श्री तुळजा भवानी मंदीर तुळजापुर यांच्या वतीने दि.५ जुन शुक्रवार रोजी कमान वेस येथील सराया धर्मशाळा येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी न.प.मुख्याधिकारी आशिष लोकरे, सह्याद्री ब्लड बँकेचे सुपरवायझर प्रताप चौरे, नगरसेवक विशाल रोचकरी, माहिला पोलीस शिपाई सौ शितल दिपक पलंगे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे कामगार संघटनेचे कर्मचारी सतिश माने, दत्ता जगताप, बजरंग सांळुके, मंथन राजंनकर, दिपक पलंगे आदीसह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबीर करण्यासाठी परिश्रम घेतले.
