तुळजापुर : कुमार नाईकवाडी

हिंदु महिला भगिनीचा वटसाविञी पोर्णिमा सण दि.५ जुन शुक्रवार रोजी पारंपरिक पद्धतीने श्री तुळजा भवानी मातेच्या नगरीत या वर्षी प्रथमच कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.


शुक्रवारी वटसाविञी पोर्णिमा सण आणि जागतिक पर्यावरण दिन असा दुहेरी संगम एकञ आल्याने निसर्गाची पुजा करण्यासाठी योग साधत माहिला भगिनीनी तुळजापुर येथील घाटशीळ रोड वरील वनविभागाच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडाची विधीवत पुजा करुन आंब्याचा वान अर्पन करुन वडाच्या झाडाची यथा सांग पुजा केली. तसेच आरती करवून वडाच्या झाडास प्रदक्षिणा मारुन कच्चा दोर्याचा धागा बांधुन आपल्या पतीराजासाठी माहिला भगिनीनी जन्मो जन्मी हाच पती मिळो म्हणून साकडे घातले.

यावर्षी प्रथमच कोरोना वायरस मोठे संकट असल्यामुळे या वर्षी कांही माहिला भगिनी नी घरातच वडाचे फाटे आणुन घरातच वडाच्या झाडाची विधीवत पुजा करण्यात आली. श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी  कोरोना वायरस मुळे प्रवेश बंद असल्यामुळे अनेक माहिला भगिनी नी राजमाता जिजाऊ माता महाद्वार जवळच उभे राहुन दर्शन घेतले.तसेच पुरण पोळीचा नैवद ही तेथील पायऱ्या वर ठेवुन श्री देवीचे बाहेरूनच कळस दर्शन घेतले तसेच शहरातील अनेक भागात असणाऱ्या माहिला वर्गानी आप आपल्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाची विधीवत पुजा करुन मनो भावे दर्शन घेतले.
 
Top