तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

भिगवण ता.इंदापुर येथील डाळज नं 2 येथे मेंढपाळावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.या हल्याचा मुख्य सुत्रधाराला शोधुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सम्राट मौर्य सेनेच्या वतीने दि.१७ रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात केली आहे.

      इंदापुर तालुक्यातील भिगवण जवळील डाळज नं २ येथे मेंढपाळ आपली बकरी चारत असताना मेंढपाळावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.इंदापुर जवळच्या गावातच मेंढपाळावर प्राणघातक हल्ला झाला असुन या हल्ल्याबाबत आमदार दत्तात्रय भरणे मात्र मौन बाळगून बसले असल्याने संपुर्ण  महाराष्ट्र धनगर समाजामधुन संतापाची लाट उसळली असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तसेच नेतृत्वहीन असलेल्या धनगर समाजाच्या अज्ञानपणामुळे समाजाला आपल्या हक्कापासुन वंचित रहावे लागत आहे.दरम्यान डाळज नं २ येथे मेंढपाळावर झालेल्या हल्ल्याचा खरा सुत्रधार शोधून त्यांच्यावर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रभर मौर्य सम्राट सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे मौर्य सेनेच्या वतीने दि. १७ रोजी  जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

      यावेळी युवक प्रदेश प्रमुख राघवेंद्र चाबुकस्वार,जिल्हाध्यक्ष हरी ढेरे,जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल कानडे,महीला आघाडी जिल्हाध्यक्षा पुजा कसपटे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माशाळकर,जिल्हा सरचिटणीस गणेश बंडगर आदी उपस्थित होते.


 
Top