तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदीर राज्य सरकारचा आदेश आल्यानंतरच चालु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानच्या गुरुवार रोजी बैठकीत सांगण्यात आले.
गेल्या १७ मार्च पासुन श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर बंद आहे.श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान यांना श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर श्री देवी भक्तांसाठी चालु करण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान च्या वतीने दि १८ गुरुवार रोजी तिन्ही पुजारी मंडळाच्या अध्यक्षा सोबत एक आढावा बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारचे आदेश येईपर्यत श्री तुळजाभवानी मंदीर चालु करता येणार नाही, समजा राज्य सरकारने तातडीने आदेश आले तर श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर चालु करण्या पुर्वी आतापासुनच मंदीर संस्थान ने प्राथमिक जय्यत तयारी केली आहे. या संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पुजारी मंडळा सोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली
या बैठकीत श्री देवीच्या दर्शनासाठी भाविक दर्शनासाठी आल्यानंतर मंदीर संस्थान ने कोरोना संसर्गजन्य रोगावरती सुरक्षेते च्या दृष्टी कोनातुन योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच राज्याच्या काना कोपऱ्यातुन श्री देवी भक्त दर्शनासाठी येत असतो या पार्श्वभूमीवर पुजारी मंडळानी ही श्री देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विशेष काळजी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच व्यापारी वर्गानी ही भाविकांची काळजी घेण्यात यावी सध्या तरी श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर जो पर्यत राज्य सरकारचे आदेश येत नाही तो पर्यत श्री देवीच्या मंदीरात श्री देवी भक्ताना प्रवेश बंद असणार आहे.
या बैठकीस श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान चे विश्वस्त एस डी.ओ.रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, तहसीलदार योगिता कोल्हे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, न.प.मुख्याधिकारी आशिष लोकरे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा, श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर, भोपे पुजारी मंडळाचे सुधीर कदम, विकास मलबा, पाळीकर पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे, संचालक नागेश सांळुके, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो,मंदीर संस्थानचे नागेश शितोळे, जयसिंगराव पाटील, विश्वास परमेश्वर आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
