नळदुर्ग, दि. 22 : 

कोरोनाचा प्रादुर्भाव नळदुर्ग शहरात वाढत असून शहरवासियांच्यावतीने मंगळवार दि. 23 ते शुक्रवार दि. 25 जून असे तीन दिवस जनता कर्फ्यू असणार आहे. 

नळदुर्ग शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराची एकूण रूग्ण संख्या तेरा झाली असून बारा रूग्णावर उपचार सुरू आहेत तर एकजण कोरोना मुक्त झाला आहे. एका हाँटेल चालकापासून त्याच्या कुटूंबातील तब्बल आठ जणांना लागण झाली आहे. शहरात सध्या तीन प्रतिबंधित क्षेञ असल्यामुळे व दररोज रूग्ण वाढत आसल्यामुळे मंगळवार पासून तीन दिवस जनता कर्फ्यू असणार आहे.

कोरोनाचे रूग्ण दररोज आढळत आसल्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी व व्यवसायिक यांनी पालिकित याबाबात बैठक घेऊन शहरात तिन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवले.  यामुळे शहरातील बाजारपेठ मंगळवार दि .२३ ते २५ पर्यंत तीन दिवस बंद ठेऊन जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. पोलिस गाडीमधून शहरात या कर्फ्यू बाबत माहिती देण्यात आली.दि. 23 पासून तीन दिवस शहरातील दवाखाने, मेडिकल हे पूर्णवेळ उघडे राहणार आहेत तर कृषी व्यवसाय दुकाने सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत उघडे असणार आहेत. उर्वरीत दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत.

या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, माजी नगरसेवक संजय बताले, नगरसेवक उदय जगदाळे, नितीन कासार, महालिंग स्वामी, नय्यरपाशा जहागिरदार, शहबाज काझी, सुधीर हजारे, शिवसेनेचे सरदारसिंग ठाकूर, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, श्रमिक पोतदार, सुशांत भूमकर, सुनिल बनसोडे,  पत्रकार विलास येडगे, सुहास येडगे, तानाजी जाधव, दिपक जगदाळे, जिलानी कुरेशी यांच्यासह व्यापारी, नागरीक उपस्थित होते.
 
Top