जळकोट, दि. २२ : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील बोरमन तांडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या वतीने पावसाळ्यामध्ये रोगराई पसरु नये. यासाठी संस्थेच्या वतीने संपूर्ण तांडया मध्ये बीबीसी पावडरची फवारणी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तांडा निर्जंतुकीकरण करण्यात आले.

या कामासाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष    विकास तुळशिराम  चव्हाण, प्रदिप जाधव,सदस्य   रूपशींग राठोड, संजय राठोड, विलास जाधव, धनराज राठोड, प्रमोद चव्हाण, मिथुन अडेकर, अमोल चव्हाण, धोंडीराम चव्हाण आदीनी परिश्रम घेतले.

 
Top