तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील वडगाव काटी येथे बांध कोरल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दि.१२ रोजी सहाजणांनी एका महीलेस व तिच्या पतीस काठी व लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली असुन तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वडगाव काटी ता तुळजापुर येथील शेतकरी विलास सुरवसे वय ३८ हा दि. १२ रोजी नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये काम करीत होता शेतात काम करीत असताना दु. १२ वा. सुरवसे यांच्या शेतीच्या पश्चिम बाजुचे शेजारील शेतकरी अण्णासाहेब पाटील हे तेजस गवळी यांच्या ट्रॅक्टरने त्यांचे शेत कुळवित होते परंतु त्यांचे शेत कुळवित असताना सामाईक बांधही कुळवुन नासधुस करत असल्याचे सुरवसे यानी पाहीले व याबाबत जाब विचारला असता अजय पाटील यानी विलास सुरवसे याना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली घराकडे जाऊन सुरज पंडीत पाटील,संजय बसवेश्वर म्हमाणे,आण्णासाहेब गणपत पाटील,अजय अण्णा पाटील,सुमीत संजय म्हमाणे,अमीत संजय म्हमाणे (सर्व रा.वडगाव काटी) हे दु. १ वा. शेतात आले संजय म्हमाणे याने विलास सुरवसे यास खाली पाडुन अंगावर बसला व ईतर पाचजणांनी काठी व लाथाबुक्क्याने मारहाण केली.हे भांडण सोडवण्यासाठी आलेली विलासची पत्नी दिपाली सुरवसे व भाऊ विकास सुरवसे यानाही काठी व लाथाबुक्क्याने मारहाण केली.दिपाली विलास सुरवसे हीला सुमीत संजय म्हमाणे व अजय अण्णासाहेब पाटील यानी खाली पाडले व अंगावर बसुन महीलेला मारहाण केली.विलास,त्याची पत्नी दिपाली व भाऊ विकास यांची वैद्यकीय तपासणी केली व या कुटुंबाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणार्या वरील सहा जणाविरूध्द दि.१३ रोजी तामलवाडी पोलिस ठाण्यात भा.द.सं १८६० नुसार कलम १४३,१४७,१४९,३२३,३२४,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संजय राठोड हे करीत आहेत.
