तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज व प्रोसाहन ५० हजार रुपये अनुदान तातडीने मिळावे या साठी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली तुळजापुर भारतीय जनता पार्टी च्या वतीने दि.२२ सोमवार रोजी तुळजापुर तहसील कार्यालया समोर आघाडी सकारच्या विरोधात घोषणा बाजी करुन मागण्याचे एक लेखी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.                    

   तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की काँग्रेस,राष्ट्रवादी व सेना महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दोन लाखा पर्यत कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती तसेच नियमीत कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन रक्कम देण्याचे अर्थ संकल्पात जाहीर केले होते माञ प्रत्यक्षात या घोषणेची अमंल बजावनी झाली नाही." राज्य सरकारच्या बांधावर खत बि बियानाचा योजनेचा बोजवरा उडाला आहे पिक कर्जाचे वाटप ठप्प झालेले आहे.पिक कर्ज मागणार्या शेतकऱ्यांना बँका मध्ये बँक  अधिकाऱ्यांकडून वारंवार अपमान सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम भरु शकत नाही याची कबुली देवून शासनाच्या नावे कर्ज मांडावे असे बँकांना सांगितले आहे.पण बँकांनी  या शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे.त्याचबरोबर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी कोरडवाहू २५ व फळबागांना ५० हजार रुपयाची घोषणा सरकार विसरले तरी ताबडतोब कर्जाचे वाटप सुरु करावे,  कर्जमाफी योजनेची अमलबजावनी पुर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 या निवेदनावर भा.ज.पा.चे नागेश नाईक, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे, संतोष बोबडे, साहेबराव घुगे, विकास मलबा, सचिन रसाळ, सुहास सांळुके, विश्वजीत पाटील, बाळासाहेब निकते, सागर कदम, राजकुमार पाटील आदीसह भा.ज.पा.कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
 
Top