तुळजापुर : कुमार नाईकवाडी
येथील जुन्या बसस्थानकात गेल्या कांही माहिन्यापासुन पेपरचे पार्सलने आलेले गट्टे चोरीस जात असल्याने अज्ञात चोरट्याचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे एक लेखी निवेदन शहर वृत पञ संघटनेच्या वतीने दि.२२ सोमवार रोजी तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवधन गवळी यांना देण्यात आले.
वृतपञ संघटनेच्या देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की, मागील कांही माहिन्यापासुन तुळजापुर येथील जुन्या बसस्थानकात पेपर चे पार्सलने आलेले गट्टे अज्ञात चोरट्याकडुन लंपास होत आहे. दि.२० शनिवार रोजी पहाटेच्या सुमारास पेपर चे ५०० पार्सल चा गट्टा अज्ञात चोरट्याने लंपास करुन पोबारा केला.येथील बसस्थानकात सर्व पेपर पार्सल ने पहाटेच्या सुमारास येतात यावेळी अज्ञात चोरटे हे पहाटे मोटासायकल वरून येतात व पार्सल चे गट्टे गाडीवरुन घेऊन जातात बसस्थानकातील सी.सी.टी.व्ही फुटेज मधुन दिसले आहे. तसेच ६ माहिन्या पुर्वी अशाच घटना घडल्या होत्या या बाबतीत वृत पञ संघटनेच्या वतीने निवेदन ही देण्यात आले माञ पोलासांनी याची दखल घेतली नाही यानंतर पुन्हा या अज्ञात चोरट्यांनी मुंडके वर काढले आहे.पेपर पार्सल चे गट्टे चोरीस जात असल्यामुळे वृत पञ विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे तरी पोलीसांनी खबरदारी घेऊन अज्ञात चोरट्यांचा योग्य बंदोबस्त करावा.पोलीसांनी या बसस्थानकात पेट्रोलिंगची गस्त वाढवुन अज्ञात चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर वृत पञ संघटनेचे अध्यक्ष सुरज बागल उपाध्यक्ष नितीन गायकवाड सचिव गणेश भातुसे सदस्य, संतोष गायकवाड, गणेश गायकवाड,संजय खुरूद आदीसह सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.
या निवेदनावर वृत पञ संघटनेचे अध्यक्ष सुरज बागल उपाध्यक्ष नितीन गायकवाड सचिव गणेश भातुसे सदस्य, संतोष गायकवाड, गणेश गायकवाड,संजय खुरूद आदीसह सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.
