नळदुर्ग, दि. 19 : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर बाभळगाव ता. तुळजापूर शिवारात भरधाव वेगाने येणा-या अज्ञात वाहनाने स्कुटीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. 19 जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
शशिकला नागेश कोळी (वय 45 वर्ष) व रोहिणी शंकर सपाटे (वय 35 वर्ष) दोघी रा. सोलापूर असे अपघतात मृत्यू झालेल्या शिक्षिकांचे नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या वत्सलानगर मधील जिल्हा परिषद शाळेत सोलापूर येथील या दोन्ही महिला शिक्षिका कार्यरत होत्या. शालेय व्यवस्थापन समितीची बैठक व विद्यार्थ्याना पुस्तके वाटपाच्या नियोजनासाठी या दोन शिक्षिका या ॲटिव्हा स्कुटीने सोलापूरहून आणदूरला आल्या. शाळेतील कामकाज संपल्यानंतर शाळेतून त्या सोलापूरला ऑक्टिवा मोटारसायकल क्रमांक एम एच 13 सीएच 9867 वरुन जात आसताना बाभळगाव ता.तुळजापूर येथील पुलावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघतात ऑक्टिवा स्कुटी जवळपास 300 फुट फरफट गेली व दोन्ही शिक्षिका जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती मिळताच इटकळ औट पोस्ट चे सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.अपघात ग्रस्त वाहन पसार झाले.
