तुळजापूर, दि. 15 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्याचे मनसे जिल्हा संघटक अमरराजे कदम परमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार दि. 15 जून रोजी तुळजापूर शहरामध्ये गरजूवंतांना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत, तालुका उपाध्यक्ष उमेश कांबळे, अक्षय साळवे, झुंबरभाऊ काळदाते, मनविसे जिल्हा सचिव सुरज कोठावळे, शहर सचिव वेदकुमार पेंदे,शहर उपाध्यक्ष विशाल माने, मनविसे तालुका अध्यक्ष सौरभ लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top