नळदुर्ग :
कोरोनाच्या महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील रुग्णांची संख्या140 च्या वर गेली आहे त्यात नळदुर्ग शहरात पहिला रुग्ण 2 तारखेला सापडला आहे. त्यानंतर शहरातील बौद्ध नगर येथे मुंबई वरून परतल्यानंतर याठिकाणी क्वारंटाईन केलेल्या तिघांचे अहवाल पॉसिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. साधारण तीन ते चार दिवस झाले असून येथील कुटुंबातील बहुतांश नागरिक हे हातावर पोट असलेले आहेत रोजच्या रोज कमाई केली तर पोट भरते अशी अवस्था असल्याने त्यांची उपासमार होऊ नये म्हणून आज दी. 15 जून रोजी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार सुजितसिंह ठाकूर जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व कुटुंबाना तांदूळ, तेल, दाळ, गव्हाचे पीठ, मीठ, तिखट, हळद, साबण असे किराणा मालाचे किट पत्रकार विलास येडगे, सुशांत भूमकर, युवामोर्चाचे शहराध्यक्ष श्रमीक पोतदार, नगरसेवक दयानंद बनसोडे, नगरसेवक निरंजन राठोड, छमाबाई राठोड, धिमाजी घुगे यांच्या हस्ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी नपचे कर्मचारी मुनिर शेख, काकडे, बाबा डुकरे, फुलचंद सुरवसे, शहर भाजपचे सरचिटणीस विशाल डुकरे, उमेश नाईक, सागर हजारे, मयूर महाबोले, सुमित यादगिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.