नळदुर्ग : तुळजापूर येथे दि २६ रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने येणाऱ्या स.न ,२० २० चा आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समस्योविषयी वेळोवेळी जागृत राहून संबंधित प्रशासनास शासकीय काम करण्यासाठी आपण आपल्या दैनिक बंधुप्रेम एन .टी. व्ही .न्यूज मराठी या वाहिनीच्या माध्यमातून आवाज उठवून सर्व सामान्यांना न्याय देण्याची महत्त्वाची भूमिका बजावला त्याबद्दल पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या कार्याची दखल घेत
"आदर्श पत्रकार "राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळेस उपस्थित सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार मराठवाड्याचे अध्यक्ष कलीम शेख जिल्हा संघटक दिनेश सलगरे ज्येष्ठ पत्रकार कुमार नाईकवाडी सचिन ताकमोघे व इतर पत्रकार उपस्थित होते