वागदरी : एस.के.गायकवाड 

 जळकोट ता.तुळजापूर येथे रयतेचे राजे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून येथील ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला असून जि.प.प्राथमिक शाळा सिंदगाव येथील इ.८ वितील विद्यार्थी प्रबुद्ध चंद्रकांत शिंदे यांचा नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या झाल्या बद्दल शालेय साहित्य देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच संजय माने तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक मुख्याध्यापक धनराज रणूके पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड आदी होते.

   प्रारंभी  मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन नवोदय विद्यालयाची परिक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्रबुद्ध शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक धनराज रेणुके म्हणाले की,राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचा आदर्श समोर ठेवून आपण शिक्षण पूर्ण करून स्वत:ची प्रगती साधावी. पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

  यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड, ग्रामसेवक बाळासाहेब कांबळे, शिवाजी लोखंडे, माजी ग्रा.प.सदस्य कागे,तुकाराम लोखंडे,प्रमानीत लेखा परिक्षक चंद्रकांत शिंदे सह ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top