तुळजापूर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले उस्मानाबाद तालुक्याती बावी (का ) येथील अरूण विलासराव उंडे यांचा नगरसेवक अभिजित कदम यांच्यावतीने शाल श्रीफळ श्रीतुळजाभवानी मातेची प्रतीमा देऊन सत्कार केला. यावेळी युवा नेते आनंददादा कदंले, मयुर कदम, राम शिंदे, राजेश्वर कदम,पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, पत्रकार श्रीनिवास साळुंके, अॅड धिरज जाधव, गणेश शेळके, योगेश महाडीक आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मागील पाच वर्षातील प्रश्नपत्रिका याचे अवलोकन करून आपल्या मनामध्ये विषयाचा परीक निर्माण करावा तसेच कोणताही क्लास हे सर्वस्व नसून स्वतःची तयारी खूप महत्त्वाची आहे सर्वसाधारणपणे चार ते आठ तास सलग अभ्यास करून यश संपादन करता येते या सर्व घडामोडींमध्ये आपला विश्वास आणि मनाची जिद्द तसेच उद्दिष्ट निश्चित असले पाहिजे शासकिय विश्रमग्रह येथे उप जिल्हाधिकारी अरुण विलासराव उंडे यांच्या सत्कार समारंभासमई युवा पिडी साठी संदेश दिला.
प्रास्ताविक आनंददादा कदंले यानी केले तर आभार मयुर कदम यांनी मानले.