कोरोनाच्या संकटाने सामान्य माणसाच्या जगण्याचा मार्गच बंद झाला आहे. मोलमजुरी, रोजगार, व्यवसाय,शेती करून पोट भरणाऱ्याच्या बोकांडी रोज महागाईचे बोझे घातले जात आहे,जिथे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या लाखोंच्या वेतनावर बंधने नाहीत,त्यांच्या पंचतारांकित सेवा सुविधांवर कंट्रोल नाही,तिथं मात्र सामान्यांच्या उरावर रोज वाढणारे इंधनाचे भाव,व एकदाच ३ महिन्याचे हाती आलेलं बेसुमार बिल,वर्षभराच्या ग्रामपंचायतीच्या घरपट्ट्या,करपट्ट्या देण्यास सरकार कसूर करीत नाही.जर शासन प्रशासनाला कोरोना संकटात बंद पडलेल्या चुली,छोटे व्यवसाय,कारखाने बंद होऊन घरी बसलेला कामगार,कोरोनाच्या भीतीत शेतमजुरी मोलमजुरी करणाऱ्यांची उपासमार,खरीप कर्ज नसल्याने उसने पैसे जमवून खरेदी केलेलं सोयाबीन बियाणे, शेतातील सर्व पेरणीचे,मशागतीच,खतांचे खर्च दिसले असते कुठं?
           
 दिसले फक्त गरिबांचे फटाके खिसे,घरात केवळ रेशनचे गहू,तांदूळ असून चालते का?अहो घरात वीज लागते,घरात तेल,मीठ,मिरची,हळद,मसाला,भाजीपाला,अन्न शिजवण्यासाठी इंधन,गैस लागतो हो,घरात आजार पाजार असतात,घरातल्या गरजा वरूनशिक्षण खर्चाचे बोझे,अंगावर असलेलं कर्ज,फायनान्स,अश्या कित्येक गरजा लागतात,मात्र सरकारी खर्चात आपल्याला सेवा गरजां लागणारर्या श्रीमंत नेत्या पुढाऱ्यांना,लाखोंचे पगार असणाऱ्या आमदार खासदार मंत्र्यांना हे कुठं दिसत हो?
    
 कोरोना संकटात दिवसागणिक रुग्ण वाढताहेत,शहरासोबत ग्रामीण भागात ही लोकडाऊन उठता उठत नाही,अशी गत झालीय,परिस्थिती हाताबाहेर गेली मात्र महागाई काही थांबली नाही,मरणाचे दिवस आले,हातचा रोजगार,काम गेलं,घरात माणसे बसली,कित्येकांचे घर उजाड झाले,कित्येक कुटुंबाने,युवकांनी आत्महत्या केल्या,कोरडवाहू शेतकरी आत्महत्या वाढल्या,करणार काय?घरखर्च भागवता येत नसल्याने मार्ग बंद झाले,अन आधार नावाचं सरकार रोज महागाई वाढवतय हे दुर्दैव नाही तर काय?
    
 सामान्य माणूस मत देतो,कर देतो म्हणून सरकार नेते निवडतात,सरकारे निवडतात मात्र जाहीरनामे अडगळीत टाकून ही मंडळी मतदारांचे उपकारच विसरतात,सामान्य माणसाला लागते काय हो?काही लागत नाही, हाताला साधे काम,व्यवसायाला जागा,थोडं भांडवल,घरखर्च भागवायला हाताला काम लागते,मिळत का?कोरोना संकटात साधे मनरेगा ची कामे तरी गावात आहे का?फक्त कागदी घोडे मिरवली जातात,शेवटी वस्तुस्थिती बघणार कोण?नेते अधिकारी फिल्ड वर जातात कुठं?केवळ उदघाटन कार्यक्रमात जातात,जनतेशी मात्र संवाद राहिला कुठं?
       
 महागाईचा बोझा वाढत आहे,त्यावर उपाय करून कमीतकमी, मूलभूत अन्नवस्तू,इंधन,प्रवास,विजबिले याची महागाई थांबवा मात्र नेमकी सामान्यांची खिसे फाडण्याचे व्यवस्थेच धोरण,व सामान्यांचे मरण हाच प्रकार वर्षानुवर्षे अबाधित आहे.

(लेख नकारात्मक असल्याचे अनेकजण म्हणतील,मात्र वस्तुस्थिती जाणून घ्यायला जाणार नाही असे विद्वान इथं खूप झालेत)

 - राम खुर्दळ,
 संपादक : शिवार शेतकरी माझा,
 राज्य उपाध्यक्ष:-पत्रकार संरक्षण समिती,महाराष्ट्र,
     
 
Top