मुरूम, देि. २४ :  देशात कोरोना संकटामुळे हाहाकार माजला असून जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यात संचारबंदी असल्याने अजूनही मनावी तशी बाजारपेठ व उद्योगधंदे सुरळीत चालू झाले नाहीत. ज्यांचे हातावर पोट आहे अशा कुटूंबियांचे तर मोठया प्रमाणात हाल होत आहेत. अशा परिस्थितीत जगणारे अनेक मजूर, कामगार व निराधार यांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशा विविध समस्यांना त्यांना तोंड दयावे लागत आहे. अनेकांचे तर छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक लोक जे उदरनिर्वाहाच्या निमित्ताने पुणे-मुंबई सारख्या शहरांमध्ये स्थाईक झाले होते त्यातील अनेकजण या कोरोनाच्या भितीपोटी गावाकडे आले आहेत. त्यामुळे गावातही त्यांना रोजगार मिळेनासा झाला आहे व भितीपोटी शहरातही जाता येईना झाले आहे. अशा परिस्थितीत शहरातील या कोरोना संकटात गोरगरीब कष्टकरी कुटूंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शंभर कुटूंबाला आठ दिवस पुरेल ऐवढ्या जीवनावश्यक वस्तूचे कीट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाठविण्यात आले होते. त्या किटचे वाटप बुधवारी (ता.२४) रोजी युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी, भुयार चिंचोलीचे सरपंच रणजित गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जगदीश निंबरगे, विशाल मोहीते, रवी अंबुसे, संजय आळंगे, जयसिंह खंडागळेसह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
 
Top