तुळजापुर : कुमार नाईकवाडी
सर्व सामान्य जनतेसाठी आपले जिवन अर्पित करणारे स्वर्गीय पवन राजे उर्फ भुपालसिंह राजेनिबांळकर यांच्या १४ व्या पुण्यतिथीचे औच्युत साधुन तुळजापुर येथील पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट शाखा तुळजापूर येथे दि.३ बुधवार रोजी स्वर्गीय पवनराजे निबांळकर यांच्या प्रतिमा समोर दिपप्रज्वलीत करुन पुष्पहार अर्पन करण्यात आले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अंत्यत साध्या पद्धतीने १४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या वेळी जिजामाता प्रतिष्ठान चे अध्यक्ष मधुकर शेळके, संस्थेचे खातेदार रंगनाथ जाधव, विजयकुमार भांबरे तसेच संस्थेचे कर्मचारी जोतिबा सप्ताळ, सुनील शेरेकर, संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत तानाजी भोसले आदीची उपस्थिती होती.
